IMMUNITY

All about vitamin C ll जीवनसत्व क ll Biggest immunity boosting vitamin ll by Dr. Ravi Aher

आपल्या शरीरात “क” जीवनसत्वाच्या अनेक भूमिका आहेत,

हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आपले शरीर साठवून ठेवू शकत नाही,

त्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी तुम्ही त्याचे दररोज सेवन अवश्य करायला हवे.
वयानुसार त्याची गरज बदलत जाते.
क जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरूपात आढळते.
पोषण
free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. स्नायू बळकट करण्याचे काम क जीवनसत्त्व करते.
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.

कमतरतेचे दुष्परिणाम
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी
क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. केस गळतात.
अतिरेकाचे दुष्परिणाम
क जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास उलटी, हगवण, पोटाच्या तक्रारी किंवा मुतखडा होऊ शकतो.

क जीवनसत्वाचे शरीरातील भूमिका
▪︎लोहाचे शोषण करणे
▪︎एंटीऑक्सीडेंट म्हणून काम करणे
▪︎शरीरातील पेशींचे नुकसानीपासून संरक्षण करणे
▪︎कुठलीही जखम भरून काढण्यात सहकार्य करणे
▪︎प्रतिकारशक्ती वाढवणे

क जीवनसत्वाचे स्त्रोत
▪︎फळे व भाज्या हे सर्व उत्तम स्त्रोत आहे
▪︎लिंबू 🍋
▪︎आवळा 🍈
▪︎अननस 🍍
▪︎किवी 🥝
▪︎संत्री
▪︎मोसंबी 🍊
▪︎स्ट्रॉबेरी🍓
▪︎पेरू
▪︎लाल शिमला मिरची
▪︎फ्लॉवर
▪︎टोमॅटो 🍅
▪︎ब्रोकोली इत्यादी 🥦
टीप: 1. शक्यतो फळे व भाज्या कच्च्या खाव्यात – कारण भाज्या शिजवतांना पाण्यात विरघळणारे क जीवनसत्त्वांचा नाश होतो.
2. लिंबाचा वापर सुद्धा कापल्यानंतर लगेच करावा.